गायकवाडांचे करोडो रुपये घेणाऱ्या मिंधेना मोदी गॅरंटी पावणार? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray On Modi Guarantee: तुमच्या पिलावळाने काम केलं असतं तर पक्ष फोडायची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.
Uddhav Thackeray On Modi Guarantee: गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज लगेच बाहेर आलं. कोणीही न मागता हे फुटेज बाहेर कसं आलं? मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत, असे गायकवाडांनी सांगितले. आता मोदी गॅरंटी मिंधेना पावणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना विचारला. उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते सिंधुदुर्गात दाखल झालेयत. सावंतवाडीपासून त्यांच्या दौऱ्याची सुरूवात होतेय. मी केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी सभेलाही येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केलं असतं तर पक्ष फोडायची वेळ आली नसती, असे आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना केले.
जाऊद्या. आज रविवार आहे तर कोंबडी वडे व्हायला पाहिजे. कोंबडीची पीस तुम्हीच काढलेली आहेत. तुम्ही चांगलीचं पीस काढलीत, या शब्दात उद्धव ठाकरेंनी आपल्या कोकणातल्या भाषणाची सुरुवात केली.
मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदरदेखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली.. मी खरी परवानगी दिली पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय, असा टोला यावेळी उद्धव ठाकरेनी राणेंच्या मेडिकल कॉलेजवरुन लगावला.
मला तुम्ही सगळेजण कुटुंबातील सदस्य मानता हे खुप आहे. मन की बात वैगेरे नाही तर आपली दिल की बात असते असे ते म्हणाले. लादी चकचकित करायची आहे. सावंतवाडी चकचकित करायची. बाजूपण चकचकित करायची आहे. बाकी वैभव नाईक आणि विनायक राऊत आहेतच असे ते म्हणाले.
गोळीबार झाला त्याच लगेच सीसीटीव्ही बाहेर आले. ते कोणीही न मागता बाहेर आले. त्याची गरज नव्हती तरीही सीसीटीव्ही आले. मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलेलो नाही तर त्यांनी काय म्हटलंय ते पाहा. माझे करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत असं गनपत गायकवाड म्हणतायत. आता मोदी गॅरेंटी किती तारतेय ते बघूया, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे खासदार आणि आमदार नेहमी निवडून दिलेत. काही लोकांनी बेईमानी केली त्यांना गाडायचे आणि निष्ठावंतांना निवडून द्यायचंय, असे यावेळी विनायक राऊत म्हणाले.