मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमाराल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमदार आणि नागरिकांशी संवाद साधला. ठाकरे यांच्या संबोधनानंतर त्यांनी घातलेली भावनिक साद बरीच गाजली. (cm uddhav thackeray )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, असं थेट म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ज्यानंतर राजकीय वर्तुळातील हालचाली वाढल्या. (sharad pawar to take meeting with all NCP mla )


तिथे उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलेलं असतानाच इथे शरद पवार, अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका दिसली, असे ज्येष्ठ नेते सक्रिय झाल्याचं दिसून आलं. 


गुरुवारी पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली असून, या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे आदेश खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. 


आता या बैठकीमध्ये हाय कमांड अर्थात शरद पवार नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या महाविकासआघाडीत आलेलं हे वादळ पाहता ते शमणार की त्याचा तडाखा सत्तेलाच बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.