Uddhav Thackeray On Old Pension Scheme: साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनाने दौऱ्याला सुरुवात केलीय.माझ्याकडे इमान आहे, विश्वास आहे. सत्ता येते-जाते. सत्ता येणार. गेलेली सत्ता मी खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिला. ते शिर्डीत बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे. आंदोलनाच्या मशालीवर सरकारच्या चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. तुमची योजना आपण सर्वजण मिळून अमलात आणू. निवडणूक येईपर्यंत यांना बहीण आहे की नाही माहिती नव्हत, त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. 


आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. ही योजना मान्य केल्याचे कदाचित ते मान्य करतील. जे शिवसेना आईवर वार करु शकतात, ते तुमच्यावरही वार करु शकतात. जनतेची सत्ता सर्वात महत्वाची आहे. जनता हीच माझी ताकद आहे. हेच माझं सरकार आहे. 


राजकारण्यांना किती पेन्शन मिळते, त्यांना मिळणारी पेन्शन आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन यातील फरक तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही पदावर येतो, जातो. आम्ही कंत्राटी कामगार आहोत.


दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.