Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, `आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी`
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Uddhav Thackeray on Narendra Modi Samriddhi Highway inauguration : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आधी कर्नाटकवर (Maharashtra-Karnataka border dispute) आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलं. (Maharashtra Political News) कर्नाटकने आमचा रस्ता बंद केला असेल तर त्यावर आधी बोला नंतर रस्त्याचं उदघाटन करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी झालेय
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झालाय. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका बोम्मई यांनी घेतली आहे. तसेच आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मोदी यांनी उद्याच्या कार्यक्रमात जरुर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघत आहे, असे ते म्हणाले.
'आम्ही काही मिंधे नाही, जे होते ते मिंधे तिकडे गेले'
घनसावंगीमध्ये भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न यावरुन सरकारवर टीकास्र सोडले. उद्या पंतप्रधान मोदी येत आहेत. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला. उद्या ते राज्यपालांच्या सगळ्या वक्तव्यांवर पांघरुण घालायचा प्रयत्न करतील की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते वगैरे. बाळासाहेब कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचं नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्यावर कदाचित ते बोलतील. माझी त्यांना विनंती आहे. तुम्ही बोला, तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही पंतप्रधान म्हणून देशाचे पालक आहात. हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे, असे बोलू नका. कुणीही यावे आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही. जे होते, ते मिंधे तिकडे गेले, असे सांगत ठाकरे यांनी शिंदे गटावरही खोचक टीका केली.
खोक्यांवर जोरदार हल्लाबोल
खोक्याचे राजकारण करायचे असेल, तर लोकशाही संपली, असे जाहीर करा. जनतेच्या मतांची किंमत भावनेत व्हायला हवी, खोक्यांमध्ये नको. जनतेने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. हा जाब विचारण्याची हिंमत साहित्यिकांनी जनतेला दिली पाहिजे. आज स्वातंत्र्य टिकविण्याची गरज असून साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले जशी जनता निवडणून देते. त्याप्रमाणे जनतेला लोकप्रतिनिधींना माघारी बोलविण्याचा अधिकार हवा, असे ते म्हणाले.