सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी ते यामध्ये करणार आहेत. यामुळे सत्तास्थापनेबाबत महाशिवआघाडीचा फॉर्म्युला आता उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतरच ठरणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी नाशिक जिल्ह्यात जावून त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली होती.


सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा अजूनही सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात यशस्वी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेशी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या आधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत हे विशेष.