औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून पुन्हा ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. नांदेड, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ओला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट बांधावर जाणार आहेत. रविवारी देखील उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत या दौऱ्याच्या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातले सर्व शिवसेना आमदार सहभागी असणार आहेत.


महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची कोंडी अजूनही फुटलेली नाही. दिल्ली दरबारी देखील राज्यातील सत्तेचा पेच सुटू शकलेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच सत्तेची कोंडी फोडण्याची जबाबदारी अमित शाहांनी सोपवली आहे. त्यामुळे शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री समसमान मंत्रिपदांचा फॉर्म्युला ऑफर करण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतरही कोंडी फुटणार का? आज तेराव्या दिवशी तरी युतीतील चर्चा सुरू होणार का? याकडे लक्ष लागलंय. तर शिवसेनेच्या गोटात नेमकं काय सुरू आहे?.


शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर नव्या समीकरणांच्या हालचालींनाही वेग आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पवार राज्यात कुणाकुणाशी चर्चा करणार आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या दिशेनं पावलं टाकणार का याची उत्सुकता आहे. 


>