उद्धव ठाकरे यांचा २३ एप्रिल रोजी रत्नागिरी दौरा
नाणार प्रकल्पाला वेग देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असताना शिवसेनेचा आणखी विरोध वाढत आहे.
रत्नागिरी : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा २३ एप्रिल रोजी रत्नागिरी दौरा आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे प्रकल्पबाधित नाणार गावाला भेट देणार आहेत, यावेळी ते ग्रामस्थांशी संवाद देखील साधणार आहेत. नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका आधीपासून स्वीकारली आहे. यात मात्र पहिल्यांदा शिवसेनेला मित्र पक्ष असलेल्या भाजपने विश्वासात घेतलेलं दिसत नाही. नाणार प्रकल्पाला वेग देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असताना शिवसेनेचा आणखी विरोध वाढत आहे.
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविषयी उत्सुकता
मुख्यमंत्र्यांनी आपला विश्वासघात केला, असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणत असताना, उद्धव ठाकरे यांना आपण नाणार विषयी समजावून सांगणार असल्याचं तसेच विश्वासात घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, दुसरीकडे नारायण राणे यांची देखील नाणार विषयीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी भूमिका घेतली आहे.