Uddhav Thackeray: मर्दानगी असेल तर... भर सभेत उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट आणि भाजपला ओपन चॅलेंज
Uddhav Thackeray: भाजपला कोण कुत्रही विचारत नव्हत. तीच भाजपा आता सगळ्यांना संपवतेय. शिवगर्जना सभेत ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला.
Uddhav Thackeray Challenge : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली (Uddhav Thackeray). या सभेत उद्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे. मिंधे..आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जिभ हासडून टाकू असे म्हणत शिवगर्जना सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला (Maharashtra Politics).
खेडमधल्या शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंसह निवडणूक आयोगवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री शिंदेंचा मिंधे असा उल्लेख करत ठाकरेंनी बोचरी टीका केली आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जिभ हासडून टाकू.असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय, निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही असा प्रहार त्यांनी निवडणूक आयोगावर केला. भाजपलाही ठाकरेंनी टोला लगावला. भाजपच्या व्यासपीठावर पूर्वी साधू-संत दिसायचे आता संधीसाधू दिसतात असा टोला ठाकरेंनी लगावला.
माझ्या बापाचे नाव न वापरता फक्त मोदींचे नाव वापरुन निवडणुका लढवून दाखवा
बाळासाहे ठाकरे तसेच शिवसेना हे नाव न वापरता फक्त मोदींच्या नावावर निवडणुका लढवून दाखवा असे खुले आव्हानच उद्धव ठाकरे यांनी या सभेत दिले. तुम्हाला तुमचा गर्व असेल की, आम्ही शिवसेना बांधली तर हे आव्हान स्वीकारा. शिवसेना नाव बाजूला ठेवा. तुमच्या आई-वडिलांचा नाव लावा जर त्यांना तुमची लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बाधून दाखवा. मी तर उघडपणे बाहेर पडलो आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही
आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. चोरटे, गद्दार यांनी शिवसेना नाव चोरले. पण, शिवसेना चोरू शकत नाही. निवडणूक आयुक्त यांना सांगायचे आहे तुमच्या डोळ्यात मोती बिंदू झाला नसेल तर बघायला या. निवडणूक आयुक्त हे गुलाम आहेत, त्यांना तत्व नाहीत. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली आहे. तुमच्या वडिलांनी केलेली नाही. तुमचा बाप वरती बसला आहे. तुम्ही शिवसेना तोंडत नाही , हिंदुत्व संपवत आहात असा घणाघात केला.
भाजपाला कुत्रा ओळखत नव्हता. पण, आता ज्यांनी सोबत दिली त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. शिवसेना आमची आई आहे.. शिवसेना ही चार अक्षर नसती तर तुमचं अस्तित्व काय असत?