आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट पुन्हा कोर्टात, काय लागणार निर्णय?
MLA Appointment: आमदार नियुक्तीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत.. त्यामुळे त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.. काय आहे राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण?
ओमकार देशमुख, प्रतिनिधी मुंबई: राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची तातडीनं नियुक्ती करून त्यांचा शपथविधीही आचारसंहिता लागण्यापूर्वी उरकण्यात आलाय.. काही तासाच आमदारांची विधानपरिषदेवर वर्णी लागली आणि विधानसभेत शपथविधी सोहळाही पार पडला.. त्यावरून आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत.. त्यामुळे त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.. काय आहे राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण? जाणून घेऊया.
कोणाची लागली आमदारपदी वर्णी?
विधान परिषदेसाठी 7 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात पार पडला. भाजपच्या तीन नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली तर अजित पवारांच्या दोन नेत्यांची आमदारपदी वर्णी लागलीय... तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी आमदारपदाची शपथ घेतलीय...विधान परिषदेवर भाजप नेत्या चित्रावाघ यांची वर्णी लागली त्यांनी शपथ घेतलीय. भाजप नेते विक्रांत पाटील आणि बाबूसिंह राठोड यांनीही शपथ घेतली.. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या मनिषा कायंदे आणि हेमंत पाटील यांनी शपथ घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इंद्रीय नायकवडी यांनीही शपथ घेतली.
आरोप-प्रत्यारोप
सातच आमदारांची नियुक्ती का केली.. उर्वरित 5 आमदारांची नियुक्ती का केली नाही असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपालांना विचारलाय. 7 आमदारांच्या नियुक्तीविरोधात याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी तातडीनं कोर्टात धाव घेतलीय.... तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आलीय. मात्र तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय.दरम्यान, आमदारांची यादी ही घटनाबाह्य असून राज्यपाल घटनाबाह्य काम करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. तर राज्यपालांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप असीम सरोदेंनी केलाय.
राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन वाद
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्याप्रकरणाचा निकाल अद्यापही आला नाही. असं असतांना 7 आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती केल्याने विरोधकांनी आक्षेप घेतलाय.. ठाकरे गटाने आता कोर्टाचेही दरवाजे ठोठावल्याने राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन वाद निर्माण झालाय.