विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे. ठाकरेंची शिवसेनेना स्वबळासोबत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने हाती घेण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हाच सूर पाहायला मिळाल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिशन महापालिका हाती घेतलं आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बीएमसी निवडणुकीच्या रणनिती संदर्भ चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीत स्वबळासोबतच हिंदुत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हिंदुस्वासंदर्भात माजी नगरसेवकांना महत्वाच्या सुचना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे? 


- हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रखरतेने लोकांपर्यंत पोहोचवा
- हिंदुत्त्वासाठी शिवसेना आधी, आता आणि उद्याही लढत राहील
- आपल्या पक्षाने हिदुत्त्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय
-  विरोधकांच्या अपप्रचारावर योग्य तो प्रतिवाद करा


अशा सुचना उद्धव ठाकरेंनी माजी नकरसेवकांनी मातोश्रीवरील बैठकीत केल्या आहेत. 



लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुंबईमध्ये चांगलं यश मिळालं होतं.. मात्र विधानसभेत धक्का बसला आहे. त्यातून मार्ग काढत उद्धव ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीसाठी आतापासून रणनिती आखायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा कट्टर हिंदुत्वाची भूमिका स्विकारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.