जालना : मी कासव व्हायला तयार आहे, पण मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला. ते जालन्यातील सभेत बोलत होते.


शिवसेनेची शेळी झाल्याच्या टीकेला उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं होतं, शिवसेनेच्या वाघाची शेळी, गांडूळ आणि आता कासव झाला असून शिवसेना आता मान आत घालून बसली आहे. त्यामुळे शिवसेना आता काहीच करु शकत नाही, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी शनिवारी हल्लाबोल मोर्चाच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये केली होती.


टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले...


या टीकेला उत्तर देताना, उद्धव ठाकरे म्हणाले, मी शेळी,गांडूळ ,ससा, कासव व्हायला तयार आहे मात्र धरणात लघुशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही, तसंच धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका.


'डल्ला मारणाऱ्यांनी आता हल्ला करु नये'


औरंगाबादमध्ये पैठणमधील सभेतही उद्धव यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेतला. आधी डल्ला मारणाऱ्यांनी आता हल्ला करु नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली आहे.