Ulhasnagar Crime: गुन्हेगारांची मजल इतकी वाढलीय की त्यांना कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याची मजल होते. अशा गुन्हेगारांना वेळीच कायद्याचा धाक देणं गरजेचं आहे.  उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसांपुर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. येथील पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेड वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोवर या गुन्हेगाराने आणखी एक गुन्हा केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस महिलेवर हल्ला केल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. बाबासाहेब सोनवणे असे या आरोपीचे नाव असून हल्ला करणाऱ्या बाबासाहेबला मध्यवर्ती रुग्णलयात उपचार सुरु होते. येथे उपचार घेत असताना आरोपीने एका रुग्णावर हल्ला केलाय. या घटनेत रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. आरोपी बाबासाहेब सोनवणे विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपी बाबासाहेब सोनवणे याने आधी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. नंतर हा आरोपी मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होता. पण येथेही त्याच्या वर्तनात काही बदल झालेला दिसला नाही. आरोपीच्या बाजूच्या बेडवर सलमान सय्यद या तरुणावरदेखील उपचार सुरू होते. दरम्यान आरोपी बाबासाहेब सोनवणे याने चक्क स्टील खुर्ची थेट सलमान सय्यद याच्या डोक्यात, तोंडावर मारून फेकली. या घटनेत सलमान सय्यद गंभीर जखमी झालंय. आरोपी हा वेड्यासारखे वागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


बारामतीच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा खून 


पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. येथे शिकत असलेला विद्यार्थी ओंकार भोईटेचा कोयत्याने सपासप वार करून खून झालाय.  यानंतर टीसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. अथर्व पोळ असं खून झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे.तो टी सी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.आरोपी ओंकार भोईटे व त्याच्या साथीदाराने हा खून केला असून आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. हा खून का करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाही.