Ulhasnagar Municipal Corporation 2023 : अनेक सुशिक्षित तरुण सध्या चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत. विविध ठिकाणी भरती सुरु असतात पण वेळेवर माहिती न मिळाल्याने तरुण नोकरीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. याच्या अर्ज करण्याची मुदत जवळ आली आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर घाई करा कारण अशी संधी पुन्हा येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर पालिकेअंतर्गत एकूण 22 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता या पदांचा समावेश आहे. उल्हासनगर पालिकेकडून यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत.


कार्यकारी अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी) ची 2 पदे,उप अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) ची 5 पदे, कामगार अधिकारी (गट अ / ब), आगार व्यवस्थापक (गट अ / ब), सहाय्यक आगार व्यवस्थापक (गट अ / ब) , प्रशासकीय अधिकारी (आस्थापन विषयक) (गट अ / ब), उद्यान अधिक्षक / उद्यान अधिकारी (गट अ / ब)  आणि हॉर्टिकल्चरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे. तसेच ब्रांच इंजिनीअरच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड 1 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. त्यामुळे करार पद्धतीने उमेदवारांची निवड होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांना  कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करून देण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


30 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. अर्ज अपूर्ण भरल्यास किंवा अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.