चंद्रशेखर भुयार, झी २४ तास, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं कळतंय. महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग लागल्याचं समजतंय. कॅम्प नंबर ५ च्या गायकवाड परिसरात ही घटना घडलीय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. परंतु, आगीमुळे नागरिक धास्तावलेत. उल्हासनगर अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झालं आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करून आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उल्हासनगरमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली. कॅम्प नंबर पाचमधल्या गायकवाड परिसरात ही दुर्घटना घडली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आग लागताच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. सुमारे २ ते ३ हजार लोक या परिसरता राहतात. संपूर्ण दाटीवाटीचा परिसर आणि आगीची तीव्रता लक्षात घेता परिसर ताडीनं रिकामा करण्यात आला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जातेय. कालपासूनच परिसरात वीजेचा लपंडाव सुरु होता आणि आज आग लागली. पण महावितरणनं याकडे दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता आहे.