केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती यांना कोरोनाची लागण
Dr. Bharti Pawar Corona positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील मंत्री आणि राजकीय नेते हे कोरोना बाधित झाले आहेत.
नाशिक : Dr. Bharti Pawar Corona positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील मंत्री आणि राजकीय नेते हे कोरोना बाधित झाले आहेत. आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Union Health State Minister for Dr. Bharti Pawar Corona positive)
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या गेल्या शनिवारपासून नाशिकमध्ये दौरा सुरु होता. तसेच दोन दिवसापूर्वी पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे त्यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर मुंबईमध्ये दौरा केला होता.
दरम्यान, देशात दैनंदिन रुग्णसंख्येत 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 24 तासांत 90 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. तसेच महाराष्ट्रातही हा वेग वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात ओमायक्रॉनच्या बाधितांचा आकडा 2600च्या पुढे गेला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत देशात करोना संसर्गाचे 90 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळलेत. हा आकडा मागील काही दिवसांच्या तुलनेत 56 टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमायक्रॉनच्या बाधितांचा आकडा 2600च्या पुढे गेला आहे. देशात सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90 हजार 928 रुग्ण आढळले आहेत.