मुंबई : जन आशीर्वाद यात्रा चांगली सुरू आहे. पण ठाकरे सरकार खोडा घालण्याच काम करत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणात कधी विकास होऊच दिला नाही. उद्धव ठाकरेला कोकणचा विकास पोटात दुखतो. सेनेत असताना सुरेश प्रभू यांना हीण वागणूक दिली, कारण ते कोकणातले होते. कोकणातल्या माणसाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात दुखतं, असं म्हणतं केंद्रीय मंत्री नारायण राणे अटकेनंतर पुन्हा एकदा आपली जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचा मेळावा संपन्न होत आहे आणि यात्राही होत आहे
गर्दीने बसावं लागत आहे याला सरकार जबाबदार, हॉल मध्ये बसू देत नाहीत
 नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यांनतर पंतप्रधान यांनी आपापल्य भागात जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगितले
-गेल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद होता मात्र अटक केली
- मी त्यावेळी तिथे असतो तर आवाज आलाच असता, असतो तर*
- दोन अडीचशे पोलीस एक केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी होती, वा काय सरकार आहे
- आता जुन्या गोष्टी काढत आहेत, रमेश मोरेची हत्या कशी झाली आम्हाला ही माहीत आहे
- वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, हे संस्कार
- सुशांत, दिशा सॅलीयनची केस अजून संपलेली नाही
- उगाच दादागिरी करू नये तो तुमचा पिंड नाही
- आवाज बरा झाल्यावर मी खणखणीत वाजवणार, मी ढोलकी पण वाजवू शकतो ना*
- भावाच्या बायकोवर, स्वतः च्या विहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, हे संस्कार*
 - आम्हाला घरात बसून काम नाही करायचं
- 39 वर्ष सोबत होतो, जवळून माहीत आहे, खूप मसाला आहे माझ्याकडे
-  शिवसेना औषधाला मिळणार नाही याची काळजी घेणार
- आमच्या घरासमोर, वरुण सरदेसाई येतो आणि हल्ला करतो त्याला अटक नाही, तो जमा करून आणतो म्हणून त्याची अवधी वट
- आमच्या घरावर कोणी येईल आम्ही नाही सोडणार
- खासदार आणि राज्यात भाजपा सत्तेत आणणं हे तुमचं काम आहे
- मी रत्नागिरीत परत येणार
- मला काही फरक पडत नाही, बरा झालो की...
- 26 योजना गरिबांसाठी आहेत 


 नारायण राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेला इशारा दिला आहे. अटकनाट्यानंतर राणेंची पुन्हा एकदा जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. जुन्या प्रकरणाला हात घालत हल्लाबोल नारायण राणेंनी केला आहे. अटकनाट्यानंतर पुन्हा नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. राणे रत्नागिरीत दाखल झाले असून राणेंच्या संपूर्ण दौ-यात आशिष शेलार राहणार सोबत.


नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीतून सुरू झाली. नारायण राणेंनी रत्नागिरी विमानतळावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत यात्रेला सुरूवात केली. रत्नागिरी शहरातून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर राणेंनी काजू फॅक्टरीला भेट दिली. या भागात आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांच्याशी राणेंनी संवाद साधला. त्यांच्या समस्या सोडण्याठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचं राणे म्हणाले.