केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली होती.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली. प्रखर उन्हामुळे गडकरी भाषण थांबवून खाली बसले. गडकरी यांची शिर्डीच्या विमानतळावर डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
मधुमेहाच्या त्रासामुळे ७ डिसेंबर २०१८ला देखील नगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गडकरींना भोवळ आली होती. शिर्डीतील सभेनंतर गडकरी विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानतळावरून गडकरी थेट निवास्थानी रवाना झाले.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गडकरी आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी गडकरी सतत प्रचार करतायत. पहिल्या तीन टप्प्यातच गडकरींनी देशभरात ५० प्रचारसभांना हजेरी लावली. त्यापैकी २७ प्रचार सभा या महाराष्ट्रात घेत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली हे विशेष.