अमर काणे झी 24 तास नागपूर :  तुम्ही आजवर अनेक वाढदिवस पाहिले असतील. वाढदिवसाच्या पार्टीला दाबून चिकन-मटण हाणलं असेल. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका हटके बर्थ डेबद्दल सांगणार आहोत, जे पाहून तुम्हालाही बर्थ डे बॉयचा हवा वाटेल. हा बर्थडे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून ज्या बर्थडे पार्टीला चिकन खाता, त्या कोंबड्याचा वाढदिवस आहे. या कोंबड्याचं नाव कुचाशेठ आहे. कुच्याची त्याच्या घरच्यांनी सदस्याप्रमाणे जपणूक केली. त्याला तसं वाढवलं. आता त्याला बोलता येत नाय इतकंच. पण भावाचा बर्थडे केल्याने गावात एकच चर्च झालीय. (Unique birthday celebration of cock in nagpur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तोऱ्यात उभा असलेला हा साधा सुधा कोंबडा नाही. तर यो आहे कुचाशेठ. त्याचं नाव जरी कुचा असलं तर रुबाब मात्र शेठलाही लाजवेल असाच आहे..नागपूरच्या उमरेड मधील कागदेलवार कुटुंबातला कुचा प्रत्येकाच्या तोंडी चर्चेचा विषय बनलाय. कागदेलवार कुटुंबियांनी त्याचा बर्थ डे असा काय जोशात साजरा केला की, बघणाऱ्यांचेही डोळे दिपले. औक्षण करून त्याला गोडधोड खाऊ घालण्यात आलं. श्रीखंड म्हणू नका, काजू कतली म्हणू नका, अगदी शेंगदाणे, काजू असा खास बेतच कागदेलवार कटुंबियांनी आखला होता.


बरं कुचाच्या वाढदिवसाला आलेली दोस्तमंडळीही खास अशीच होती बरं का? दारात ऐटीत बसलेला हा बुलेट. तसं पाहिलं तर कुत्र्याचं आणि कोंबडयाचं कधी पटत नाही..पण बुलेट आणि कुचामधली मैत्री खास अशीच आहे. म्हणून बुलेटराजाही कुचाशेठला बर्थ डे विष करायला आला होता. आता नागपुरात ज्याच्या त्याच्या तोंडी या कुचाशेठची चर्चा रंगलीय. कारण बड्डे हाय भावाचा.