अकोला : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ, मराठवाड्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट भागातल्या काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे या भागातले मुख्य हरभरा पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मासरूळ या शिवारात अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळी वारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. दरम्यान पाऊस पडत असताना गारपीट देखील झाली.


पिकांना फटका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला असून नुकताच बहरलेल्या आंब्याच्या मोहोराला सुद्धा फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातही रात्री गारांचा पाऊस झाला.


वीज आणि पाऊस 


भोकरदन शहरासह परिसरात आणि अंबड तालुक्यातल्या वडी रामसगाव शिवारात गारांचा पाऊस झाला तर जाफ्राबाद तालुक्यात देखील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.


आंब्याचे नुकसान 


रब्बी हंगामातील पिकं सोंगणी करून उघड्यावर पडलेली असल्यानं या पिकांची गंजी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र धावा-धाव झाली. आंबा बागांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.