UPSC Topper: श्रवणशक्ती गमवली तरी मानली नाही हार, सौम्या शर्मा यांनी 4 महिन्यांच्या तयारीतच मिळवलं यश
saumya sharma ias : सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत त्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
Saumya Sharma : मंगळवारी धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (tukaram mundhe) यांच्यांसह जवळपास 24 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात प्रतिक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्वांमध्ये सौम्या शर्मा (Saumya Sharma) हे नाव सध्या चर्चेत आहे. अनेक आयएएस (IAS) अधिकारी मोठ्या मेहनीतीने या पदापर्यंत पोहोचल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. सौम्या शर्मा यांचीही कथा अशीच काहीशी प्रेरणादायी आहे.
सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत त्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सौम्या शर्मा यांची आयएएस बनण्याची कथा प्रेरणादायी आहे. वयाच्या 16 व्या वर्षी 90 ते 95 टक्के श्रवणशक्ती गमावूनही त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात नववा क्रमांक पटकावला होता. मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या सौम्या शर्मा या महाराष्ट्रात सेवा बजावत आहेत.
पहिल्याच प्रयत्नात मिळवलं मोठं यश
2017 मध्ये यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सौम्या शर्मा यांनी संपूर्ण देशात नववा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे सौम्या शर्मा या लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. अनेक लोक दरवर्षी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण फक्त काही जणच यशस्वी होतात. सौम्या शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. वयाच्या 23 व्या वर्षी सौम्या शर्मा यांनी हे यश मिळवले होते.
सोशल मीडियावरही सक्रिय
आयएएस अधिकारी सौम्या शर्मा यांची मार्कशीटही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यांनी सर्व पेपरमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले होते. त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले आहे. सध्या त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. सौम्या शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 2 लाखांहून अधिक तर ट्विटरवर 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सौम्या यांचे पतीही अधिकारी
सौम्या यांचे पती अर्चित चांडक हे 2018 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अर्चित हे सध्या नांदेड येथे कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडियावर दोघेही मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात.