प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणतात, `आमदारकी मिळाली तर....`
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली वाचा काय म्हणाल्या...
पुणे: शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभा दरम्यान त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांची चर्चा होत आहे. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थितीत पुण्यात शिवसंपर्क अभियान कार्यक्रम पार पडला. .यावेळी बोलताना उर्मिला यांनी महाराष्ट्रातील युवा पिढीला साद घातली आहे.
महाराष्ट्रातील युवा पिढीने आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक जाण असणं आवश्यक असल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे. मी पुण्यात असंख्य वेळा आले, मात्र आजची भेट स्पेशल आहे.
आजची भेट स्पेशल असण्याचं कारण म्हणजे आज शिवसेनेची रणरागिणी म्हणून आल्याचं तिने म्हटलं. यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. 12 आमदारांच्या नियुक्तीमध्ये आपली नियुक्ती व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी दिलेल्या उत्तरात दिसून आलं.
यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत बोलताना उर्मिला म्हणाल्या की, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल विचार करतील तेव्हा करतील. आमदारकी मिळाली तर उत्तमच मात्र मी काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.