कोल्हापूर : कोल्हापूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॉयलेटमधील पाणी हे पाणीपुरीचा मसाला तयार करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहे. स्थानिक लोकांनी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या पाणीपुरीवाल्याला पळवून लावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा पाणीपुरीवाला त्याच्या चवीसाठी शहरभर प्रसिद्ध होता. कोल्हापुरातील रंकाळा तलावाजवळ तो गाडी लावायचा. दररोज शेकडो लोकं पाणीपुरी खाण्यासाठी येथे येत असत. व्हिडिओमध्ये आरोपी व्यक्ती एका प्लास्टिकच्या भांड्यात शौचालयाच्या बाहेरच्या नळातून पाणी भरताना दिसत आहे. त्यानंतर तो हे पाणी घेऊन पाणी-पुरीच्या मसाल्यांमध्ये मिसळतो.



स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळाली आणि संतप्त स्थानिक जमावाने त्याची गाडी फोडली. त्याच्या खाण्याच्या वस्तूही लोकांनी रस्त्यावर फेकून दिल्या.


स्वत:चा बचाव करत आरोपीने म्हटले की, 'हे पाणी केवळ लोकांचे हात धुण्यासाठी ठेवले होते. व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे गैरसमज निर्माण झाला. काही लोकांनी मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.'