सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : ही बातमी आहे नांदेडमध्ये भरलेल्या एका महोत्सवाची.... ज्याला द्यायचं असेल त्यानं द्यावं, ज्याला घ्यायचं असेल त्यानं घेऊन जावं.. असा हा उत्सव होता.... पाहुया काय घडलं या महोत्सवामध्ये....  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमधला हा आगळा वेगळा उत्सव..... ज्यांच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत, त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कपडेदान महोत्सव.... दारिद्र्य निर्मुलन समितीतर्फे या कपडेदान उत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय.  तुमच्याकडे असलेले जास्तीचे कपडे द्या आणि ज्यांना गरज असेल त्यांनी हे कडे घेऊन जा, इतकी साधी आणि छान या उत्सवाची कल्पना.... दारिद्र्य निर्मूलन समितीचे रमेश भालेराव आणि त्यांची पत्नी छाया भालेराव यांनी गेल्य़ा वर्षीपासून हा उपक्रम सुरू केलाय.... 


आजही आपल्याकडे आहे रे आणि नाही रे या दोन वर्गांतलं अंतर खूप मोठं आहे....  अशा कपडेदान उत्सवातून ही दरी मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय. 


या कपडेदान उत्सवाला नांदेडकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि गोठवणा-या थंडीत गरजवंतांना कपड्यांबरोबरच मायेची उबही मिळाली....