राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा तर नाशिकमध्ये ऑक्सिजन
राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे.
मुंबई : राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि बुलडाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. कोल्हापुरातही लसीचा साठा संपत आला आहे. त्यामुळे हे लसीकरण केव्हाही बंद पडणार आहे. तसेच नाशिकमधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असली तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली लस कमी प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण वेगाला मर्यादा येणार आहेत.
देशभरात 50 टक्के रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्याला केवळ 7.5 लाख देण्यात आले आहेत. मात्र, इतर राज्यांना जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आहेत. राज्यातले सर्व कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केलीय, दर आठवड्याला 40 लाख लसींची मागणी आमची पुरवावी ही आमची मागणी आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
इतर राज्यांचा विचार करता महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस पुरविण्यात आहे. आधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कोरोना लसीची कमी ऑडर केल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रावर टीका केली आहे.
केंद्राकडून कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला नाही तर तीन दिवसानंतर लसीकरण बंद पडेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला होता. त्यानंतर आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पनवेल या ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. साताऱ्यात लस संपली आहे.
राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख आहे. मृतांची संख्या 57 हजार, एकूण बाधितांची संख्या 30 लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त 7.5 लाख लसी का, असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे. 7 दिवसाला 40 लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला 40 लाख आणि महिन्याला 1 कोटी 60 लाख डोस मिळायला हवेत, असे टोपे म्हणालेत.