पालघर : जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षा आणि १७ नगरसेवकांची निवड या मतदानातून होणार आहे. 


पाच महिला उमेदवार रिंगणात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जमाती महिला नगराध्यक्ष पदासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवार रिंगणात असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 


मंत्र्यांची कन्या रिंगणात


भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांची कन्या निशा सावरा रिंगणात असून शिवसेनेकडून निशिगंधा कोळेकर रिंगणात आहेत. या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. 


 निवडणूक यंत्रणा सज्ज


जवळपास १० हजार मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून ७९ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून विविध समस्यांनी ग्रासलेले वाडावासिय कोणाला कौल देणार याकडे लक्ष लागले आहे.