अमरावती : वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमने बाहेर पडायचा निर्णय घेतला असला तरी फारसा फरक पडणार नसून वंचित २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे दिली. दर्यापूर येथे अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने मातंग समाज सत्ता संपादन व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजाची मते मिळाली नाही. मात्र काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत वंचितला मुस्लिमांची देखील मतं मिळतील असे प्रकाश आंबेडकर यांनी बोलतांना सांगितले. 



एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यावर वंचित आघाडी ठाम असल्याने आमची युती तुटल्याचे इम्तियाज यांनी म्हटले होते. ओवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचं आपणास सांगितल्याचे ते म्हणाले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती.


आमची युती ही  महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झाली नसून ओवेसी यांच्यासोबत झाल्याचा टोला त्यांनी इम्तियाज यांना लगावला होता. शेवटच्या दिवसापर्यंत आमची युती होऊ शकते असेही आंबेडकर म्हणाले. या पार्श्वभुमीवर वंचितने २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.