Vande Bharat express Menu: भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat express) अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. याचपार्श्वभूमीवर सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना महाराष्ट्रीयन पदार्थांची (maharashtrian food) चव चाखता येणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण होणार आहे.  


या दोन रेल्वेगाड्यामध्ये खाद्यपदार्थांची सोय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सात्विक परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार, धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर शाकाहारी भोजन सेवा सुरू करण्यासाठी आणि शाकाहारी भोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी IRCTC सोबत करार केला आहे.  यामध्ये मेल-एक्सप्रेसमध्ये देणात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी- ज्वारी – नाचणी या भरड धान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सुरूवातीला सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमधून होणार आहे. 


दरम्यान सीएसएमटी शिर्डी, सोलापूर या दोन्ही रेल्वे गाड्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आहेत. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांकडून जास्त प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई ते शिर्डी हा प्रवास एका दिवसात शक्य असल्याने परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. 


वाचा: मोठा खुलासा; त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवरील चमत्कारिक बर्फ खोटाच 


अस्सल कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा


या दोन्ही गाड्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा -शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी, बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पदार्थ आहेत. तर जेवणासाठी शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय प्रवाशांना देण्यात येणार आहे. यासह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना नाश्त्यामध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबीर वडी, भरड धान्यांचे थालीपीठ, साबुदाणा वडा ठेवण्यात आला आहे. मांसाहारी खवय्यांसाठी सावजी चिकन, कोल्हापुरी तांबडा रस्सा देण्यात येणार आहे.