Shocking News : या असल्या बाईला आई म्हणायचं? दोन लेकरांना मारहाण करत गुप्तांगाला दिले गरम चाकूचे चटके
आईनेच दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ करत गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे.
Vasai Crime News : महाराष्ट्रात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनां समोर येत असताना, वसईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आईनेच आपल्या दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या निर्दयी माते विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वसईच्या वालिव पोलिस ठाणे हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सावत्र आईने आपल्या सात आणि आठ वर्षांच्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण केली. इतकंच नाही तर या निर्दयी मातेने मुलांच्या गुप्तांगानाही गरम चाकूने चटके दिले आहेत. याप्रकऱणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
आरोपी महिलेचा पती हा कामानिमित्त घराबाहेर असतो. तो पुन्हा घरी आल्यानंतर त्याला त्याच्या मुलांचे वागणे हे संशयास्पद वाटले. त्याने मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. चटके दिल्याचे वळ वडिलांच्या लक्षात आले. यानंतर वडिलांच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी या प्रकरणी नेहा सावगरळी विरोधात कलम 324, 323, 504, 506 तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 त्या कलम 75 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय. पीडित मुलगी ही 10 वर्षांची असून ती मामाकडे राहायला होती.. महिभरापूर्वी आईवडील नसताना आरोपीनं तीच्यावर लैंगिक अत्याचार केला.. त्यानतंर बदनामीची धमकी देत तो तीचं लैंगिक शोषण करत होता.. अखेर पीडित मुलीनं वडिलांना सांगीतल्यानंतर वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.. पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी युवराज गवळी याच्यावर गुन्हा दाखल केला.. आणि त्याला अटक केलीये. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.