Vasai Crime News Update: वसईच्या खैरपाडामध्ये २० वर्षांपूर्वी झालेल्या चार जणांच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणातील (Vasai Murder Case) फरार आरोपीला अटक करण्यात आले आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या (Valiv Police Thane) गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापुरच्या इचलकरंजी येथून आरोपीला अटक केली आहे. (Crime News In Marathi)


चार जणांच्या हत्येचा गुन्हा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप तिवारी असे या आरोपीचे नाव आहे. दिलीप कोल्हापुराच्या कळंब कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याचवेळी २०२१ मध्ये संचित रजेवरून तो फरार झाला होता. दिलीपच्या नावावर चार जणांच्या हत्येचा गुन्हा नोंद आहे. त्यामुळं त्याला पडकण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. 


तुरुंगातून झाला होता फरार


करोना काळात दिलीप तिवारी याने ३० दिवसांच्या संचित रजेसाठी (पॅरोल) अर्ज केला होता. त्यानुसार त्याला रजादेखील मंजूर झाली होती. मात्र तुरुंगातून बाहेर येताच तो फरार झाला. त्याला पुन्हा अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके रचली होती. मात्र त्यात यश येत नव्हते. आरोपी संकेत तिवारी गुन्हेगारी कारवायामध्ये सक्रीय असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालीव पोलिसांनी या आरोपीची माहिती मिळवली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला पुन्हा अटक करण्यात यश मिळविले आहे.


काय घडलं होतं?


बहिणीने खालच्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याच्या राग आरोपी दिलीप याच्या मनात होता. त्याच रागातून त्याने बहिणीच्या कुटुंबातील चार जणांची गळे चिरून हत्या केली होती. या प्रकरणात तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. अखेर त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


आईच पोटच्या मुलीला जबदरस्ती द्यायची हार्मोन्स पिल्स, शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले; कारण...


कुलकर्णी हत्याकांड


छत्रपती संभाजीनगरला हादरवून टाकणाऱ्या आणि 2018 साली गाजलेल्या संकेत कुलकर्णी खून (Sanket Kulkarni Murder) खटल्याचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मुख्य आरोपी संकेत जयभाय याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  संकेत कुलकर्णी या 18 वर्षीय मुलाला माझ्या मैत्रिणीला फोन का करतो म्हणून आरोपी संकेत जयभाय याने गाडी खाली चिरडून ठार केले होते. आरोपी जयभाये वय 22 याने संकेतला कामगार चौकात भेटायला बोलावले होते, त्यात दोघांमध्ये वाद झाला, त्यातून आरोपीने संकेतच्या अंगावर कार घातली. वारंवार संकेतच्या अंगावर कार घातल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात नेईपर्यंत त्याने जीव सोडला होता.