Vasai Virar News in Marathi : गेल्या काही वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर, वसई-विरार किंवा सर्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवरच अवजड वाहतूकीची संख्या देखील वाढत चालली आहे. या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते, अंतर्गत मार्गिक कमी पडू लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता वसईकरांची दगदग लवकरच संपुष्टात येणार आहे. तसेच भाईंदरहून वसईला रस्ते मार्गे जायचे असेल तर आता एक ते सवा तासाचा कालवधी लागत होता. आता तुमचा वसई-भाईंदर दीड तासाचा प्रवास आता दहा मिनिटात शक्य होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे? कारण भाईंदर ते वसई आणि वसई ते भाईंदर या समुद्रमार्ग येत्या दोन दिवसात रो रो सेवा दाखल होणार आहे.  या रो रो सेवेचा तुम्हाला किती फायदा होणार आहे ते जाणून घ्या... 


ठाणे, मीर-भाईंदर, भिवंडी, कल्याण या महानगरपालिकांना जोडणारा जलवाहतूक प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प इको फ्रेंडली असून लाखो नागरिकांना प्रवासाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे. वसई किल्ला ते भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यासाठी अडथळा असणाऱ्या वसई जेटीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असून येत्या 16 फेब्रुवारीला रो रो सेवेचे उद्घाटन होणार आहे. 


त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाच्या वेळेत 34.7 किलोमीटरचे अंतर कमी होणार असून प्रवास वेळेत 55 मिनिटांची बचत होणार आहे. वसई ते भाईंदर दीड तासाचा प्रवास रो-रो सेवेमुळे आता दहा मिनिटात शक्य होणार आहे. आपली वाहने बोटीतून टाकून प्रवास करता येणार आहे. या रो रो ला जान्हवी नाव देण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच रो-रो सेवेच्या जेट्टीची पाहणी केली असून शुक्रवारी या सागरी सेवेचे उदघाटन होणार असून त्यासाठीची जोरदार तयारी सुरु आहे.


अशी असणार रो रो सेवा


या रो रो सेवेसाठी खासगी कंपनीची सागरी महामंडळाने नियुक्ती केली आहे. या रो रो बोटमध्ये 50 दुचाकी आणि 30 चारचाकी वाहन क्षमता असणार आहे. त्याचबरोबर प्रवासी क्षमता 100 पेक्षा जास्त असणार आहे. या रो रो बोटची किंमत 6.2 कोटी रुपये आहे. वसई ते भाईंदर हे रस्त्याचे सरासरी अंतर 38.20 किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र आता जलद मार्गाने हे अंतर केवळ  3.57 किलोमीटर असेल. त्यामुळे रोरो बोट प्रवाशांना वसई ते भाईंदर सुमारे 10 ते 15 मिनिटांत  भाईंदरमध्ये पोहचवणार  आहे. वसई आणि भाईंदर सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत रोरो बोट सेवा नागरिकांना उपलब्ध असेल. जेट्टीजवळ प्रवाशांसाठी वेटिंग रूम, टॉयलेट आणि तिकीट बुकिंग काउंटर उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना नाश्ता करण्यासाठी कॅफेटेरिया उपलब्ध असेल.


वैशिष्ट्ये


भाईंदर ते वसई रस्ते मार्ग अंतर 38.20 किमी - वेळ दिड तास


जलवाहतुकीचे अंतर 3.75 किमी. वेळ - 15 मिनिटे


प्रवासवेळेत दीड तास बचत