प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा :  नालासोपारामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नऊ  कैद्यांना विषबाधा (prisoner poisoned) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारच्या जेवणातून त्यांना ही विषबाधा झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कैद्यांना पालिका रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा पोलिसांच्या (Nallasopara Police)कोठडीत वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या 9 आरोपींना मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सरकारी जेवण आले होते. हे जेवण जेवल्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा व मळमळण्याचा त्रास होऊ लागला. या त्रासात अनेक आरोपींनी उलट्या देखील केल्या होत्या. हा प्रकार पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी या रुग्णांना वसई विरार  (Vasai -Virar) पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कैद्यांना जेवणातूनच विषबाधा (prisoner poisoned) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचे नमुने पोलिसांनी तपासणासाठी पाठवले आहेत. 


वेगवेगळ्या गुन्ह्यातील हे आरोपी असून सध्या त्यांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती नालासोपारा पोलीस (Nallasopara Police) ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली आहे.मात्र एकाच पोलीस ठाण्यातील या आरोपिंना विषबाधा झाल्याच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.