रत्नागिरी : जिल्हयाला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक बंदीमुळे अवजड वाहतूक कुंभार्ली घाटातून सातारा मार्गे वळवली आहे. काही वाहतूक ही चिपळूण-गुहागर बायपास मार्गे वळवण्यात आलीय. चिपळूणच्या बाजारपेठेत पूराचं पाणी घुसले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. 


वाशिष्ठी नदीवरचा बाजारपुल पाण्याखाली गेलाय. चिपळूणच्या चिंचनाका, जिप्सी कॉनर, नाईक कंपनी, जुना बाजारपुल, भाजी मंडई या ठिकाणी पाणी भरलंय. तसेच हवामान खात्याकडून येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.