सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भाजीपाल्यासह डाळींना महागचा फटका बसला आहे. याचा परिणाम सामान्य ग्राहकांना सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे. उन्हाचा पारा चढायला लागला तसतसा भाज्यांचे भाव सुद्धा  वाढू लागलेत. मुंबईमधील बाजारात सध्या भाज्या आणि डाळींचे चढेभाव अनेकांसाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनले आहे. परंतु ह्या महागलेल्या भाजीपाल्याचा आणि डाळींच्या वाढलेल्या किंमतीमधुन शेतकऱ्यांना मात्र तितकासा थेट फायदा होताना दिसत नाही.भाज्यांची आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे  गेल्या आठवडाभरापासून भाज्यांचे दर हे 20 ते 30 रुपये वाढलेले पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे 


भाज्यांचे वाढलेले दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजी  - रिटेल बाजारभाव- होलसेल बाजारभाव
हिरवी मिरची - ८०  -६० रूपये
आलं -१२० - १०० रुपये
कांदा -२० रूपये
लसुण -१२०-१०० रूपये
मेथी - ३०-२५ रूपये जुडी
कोथिंबीर -४० -२५ रूपये
पालक - ४०-३० रुपये
लिंबू -४०० ला १०० नग
फरसबी - १२०-१०० रूपये किलो
मटार - १२०- ९० रुपये
शिमला -३०-४० रूपये
भेंडी - ३० ४० रुपये
टॉमेटो -४०-५० रुपये
मुग दाळ -१००
उडीद -१००
तुरडाळ - १००
मयुर -८०
चना डाळ -८०



पावसाळ्या पुर्वीच घरात अनेक मंडळी धान्य डाळी भरून ठेवतात ह्या साठवणुकीमुळे आणि वाढीव मागणी मुळे सध्या डाळींचे भाव चढे झालेले पाहायला मिळताय परंतु १०० रूपये पार करत डाळीची किमतीचे गणित सांभाळण सामान्य मुंबईकरांच्या नाकी नऊ आणत आहे. जीवनावश्यक वस्तूचे वाढलेले भाव हे पाऊस पडल्यानंतर नवीन पीक येईपर्यंत चढे राहणार असून, पाऊस चांगला झाला तर ही महागाई कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.