सातारा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारे आणि लाखो पर्यटकांना वर्षभर बोटिंगचा मनमुरादपणे आनंद देणारे 'वेण्णा लेक' धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी पाण्यानं तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासह पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला होता. मात्र आता वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरल्यानं स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७२७ मिमी पावसाची नोंद झालीय. यामध्ये महाबळेश्वरमध्ये तब्बल १०८५ मिमी पावसाची नोंद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनच्या मुसळधार पावसाने महाबळेश्‍वरमधील 'वेण्णा लेक' काल रात्री पूर्ण भरले. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच वेण्णा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. उशिरा आलेल्या मान्सूनमुळे महाबळेश्‍वरात पावसाला उशिरा सुरुवात झाली. एप्रिल अखेरच 'वेण्णा लेक'मधील पाण्याने तळ गाठला होता. ऐन उन्हाळ्यात वेण्णा लेकमधील पाण्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह पर्यटनावरही याचा विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे एकूणच महाबळेश्‍वरसह पाचगणी नगरपालिका प्रशासन चिंतेत होते. मात्र, त्यांची चिंता आता मिटलीय.