आतिश भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवलीत परिस्थती विकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दिवसाला दीड हजारच्या आसपास रुग्ण सापडू लागल्याने प्रशासनाची आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. केडीएमसी प्रशासनाकडून 6572 खाटाची व्यवस्था केली असली तरी आज व्हेंटीलेटर, आयसीयूच्या रिकाम्या खाटा फुल्ल झाल्या आहेत. यामुळेच कोरोनाच्या कहरापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांनी शक्य असल्यास होम क्वारटाईन व्हावे, रुग्णांना लागणाऱ्या औषधाचे कीट तातडीने रुग्णाला घरपोच दिले जाईल असे आवाहन पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णाना तातडीने उपचार करता यावेत यासाठी आतापर्यत 6572 खाटा उपलब्ध करून दिल्या असून यात महापालिका व खाजगी मधील कोव्हीड केअर सेंटर, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेटीलेटरच्या सुविधा असलेल्या बेड्स चा समावेश आहे. यात कोव्हीड केअर सेंटर अन ऑक्सिजनचे बेड उपलब्ध असले तरी आयसीयू आणि व्हेटीलेटरच्या खाटा फुल्ल झाल्या आहेत. मात्र तरीही रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून पालिकेने 10 प्रभाग क्षेत्रात वार रूम स्थापन केले असून या वार रूम मधून दररोज रुग्णाशी संपर्क साधत रुग्णाची चौकशी करत त्याना रुग्णालयात अडमिट करण्याची व्यवस्था केली जाईल. 


मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घरगुती विलगीकरणाचा पर्याय निवडावा. पालिकेकडे पुरेशी औषधे असल्यामुळे या रुग्णांना घरपोच औषधाचे कीट पोचवले जाईल. तसेच किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे. ज्यांना खरोखर गरज आहे अशाच रुग्णांना ऑक्सिजन खाटावर दाखल केले जाईल. 


येणाऱ्या काळात 1000 खाटाच्या कोव्हीड केअर सेंटर रुग्णालय सुरु केले जाणार असून पुढील 10 दिवसात 200 आयसीयू आणि 400 ऑक्सिजन खाटांचे रुग्णालय सुरु केले जाणार असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वताची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


केडीएमसी व खाजगी रुग्णालय मिळून 6572 बेड्स


ऑक्सिजन बेडस - 1808


आयसीयू बेडस -693


व्हेंटिलेटर 197


जनरल बेड 4071


महापालिका क्षेत्रातील एकूण खाजगी बेड - 1639


ऑक्सिजन बेडस - 872


आयसीयू बेडस -389


व्हेंटिलेटर - 114


जनरल बेड - 378


केडीएमसीचे एकूण बेड - 4833


ऑक्सिजन बेडस - 936


आयसीयू बेडस -304


व्हेंटिलेटर - 83


जनरल बेड - 2438


# खाजगी व केडीएमसी मधील जनरल बेड वगळता आयसीयू व व्हेंटिलेटर फुल झाले आहेत