शिर्डी, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय
जाण्याचा बेत करण्या अगोदर ही महत्वाची बातमी वाचा
मुंबई : शिर्डी आणि पंढरपूरला (Shirdi, Pandharpur) दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. (Very important decision) साईबाबांच दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पास सक्ती नाही.
शिर्डीत गुरुवार,शनिवार आणि रविवारी दिवस फक्त ऑनलाईन पास धारकांना दर्शन देण्यात आले येणार आहे. . तसेच दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेण्यात आला आगे. गर्दी नियंत्रणासाठी ३ दिवस पास वितरण केंद्र बंद ठेवणार
शिर्डीत गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसंच सुट्ट्या आणि सणांच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या दिवशी केवळ ऑनलाईन पासेस असलेल्यांनाच साईदर्शन दिलं जाणार आहे. शिर्डीतील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासकरता सक्ती नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे.
महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीला महिलांना ओवसायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या दिवशी दर्शन सुरूच राहणार आहे. कोरोना नियमानुसार दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश नाही, अशी माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
सोलापुरातल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनामुळे भक्तांविना धार्मिक विधी पूर्ण, सर्वसामान्यांना मात्र प्रवेश देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रासह कर्नाटक ,आंध्र प्रदेशपर्यंत लौकिक असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील सर्व धार्मिक विधी संक्षिप्त स्वरूपात पार पडले. योगदण्ड पूजन करून हे योगदण्ड मुख्य मंदिराकडे रवाना होणार आहेत. ही यात्रा जिथून सुरू होते त्या हब्बूवाड्याला मात्र पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय सर्वसामान्य भाविकांना आत सोडलं जात नाही आहे.