कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ शकतो. नवीन पूलाचे गर्डर टाकण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागातर्फे पत्रिपत्रक काढून प्रवाशांना सूचित करण्यात आले आहे तसेच पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले आहे.
असा असेल मुंबई गोवा महामार्गावर विशेष ब्लॉक
मुंबई गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै असे तीन दिवस विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान महामार्ग 4 तासांसाठी बंद राहणार आहे.
सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या काळासाठी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. कोलाड जवळील पुई येथील म्हैसदरा नदीवरील पुलाचे काम केले जामार आहे. पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 3 दिवस 4 तास वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल. वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल. या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा अशा सूचना वाहतूक विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली
कोकण रेल्वे मार्गावर पेडने येथे बोगद्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे . पाणी बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरू होईल .या कारणामुळे या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे एक तासात सुरू होईल असं कोकण रेल्वे कडून कळविण्यात आले आहे. दरम्यान कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हे पेडणे येथे स्पॉटला पोहोचले आहेत. कोकण रेल्वेचे कर्मचारी त्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत. यामुळे 12618 मंगला एक्सप्रेस कणकवली येथे थांबवण्यात आली आहे .12 0 51 जनशताब्दी सावंतवाडी येथे थांबवण्यात आली आहे. 22 119 तेजस एक्सप्रेस कुडाळ येथे थांबवण्यात आली आहे. तर 22660 कोचिवली एक्सप्रेस वैभववाडी येथे थांबवण्यात आलेली आहे. 20112 कोकणकन्या एक्सप्रेस दोन तास उशिराने सुटण्याची शक्यता आहे.