Maharashtra latest news : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Demise) यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. देशमुख यांची फॉर्च्युनर कार एका कालव्यात कोसळली आणि काही कळण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. या अफघातामध्ये तिघं गंभीर जखमी झाले असून, मीना देशमुख यांचा मृत्यू झाला. (Veteran lavani artist Meena Deshmukh Fortuner Car Accident into 50 feet Canal in Pandharpur News Marathi)


अपघातातून लेक बचावली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोडनिमकडून पंढरपूर रोखानं प्रवास करत असतानाच रविवारी रात्री जाधव ज्या कारमध्ये होते ती फॉर्च्युनर खोल कालव्यात कोसळली. या भीषण अपघातातून देशमुख यांची मुलगी, नात आणि चालक बचावले असले तरीही ते गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 


कसा झाला अपघात? 


पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाने मीना देशमुख या लावणी कलावंतांचा जीव घेतला. रोज शेकडो प्रवाशांना या धोकादायक पुलावरून करावा प्रवास करावा लागतोय, अशाच प्रवासानं देशमुख यांना प्राण गमवावे लागले. 


वाचा : मुलाच्या लग्नासाठी खरेदीला गेलेल्या आईने संपवलं आयुष्य; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह


 


पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून काल रात्री एक फॉर्च्युनर गाडी नियंत्रण सुटल्याने थेट पन्नास फूट कालव्यात पडली. या अपघातात मोडनिंममधील लावणी कलावंत मीना देशमुख ( वय 60) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कालव्यात उतरण्यास रस्ताच नसल्याने बराच वेळ अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही ज्यामुळं ही वेळ ओढावली.


अपूर्ण रस्त्यांची कामं आणखी कितीजणांचे बळी घेणार? 


सदर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार आणखी किती बळींची वाट पाहणार आहेत असा प्रश्न उपस्थित होतो आहे.