मुलाच्या लग्नासाठी खरेदीला गेलेल्या आईने संपवलं आयुष्य; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

एकीकडे लग्नाची तयारी सुरु असताना महिलेने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वच कुटुंबियांना धक्का बसलाय

Updated: Nov 28, 2022, 11:52 AM IST
मुलाच्या लग्नासाठी खरेदीला गेलेल्या आईने संपवलं आयुष्य; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह title=

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या एका बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेत आपलं जीवन संपवल्याचे समोर आले आहे. लातूर (Latur) येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता प्रभू जाधव यांनी रविवारी हॉटेलच्या रुममध्येच गळफास घेतला. लग्नाची तयारी सुरु असतानाच स्नेहलता यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. (wife of a senior government official of Latur ended her life in karnataka hotel)

नेमकं काय घडल?

प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न होते. यामुळे खरेदीकरण्यासाठी जाधव हे पत्नी आणि नातेवाईंकासह कर्नाटकातील (karnataka) चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. रविवारी सकाळी काही कामानिमित्त प्रभू जाधव हे लातूरला गेले. त्यानंतर स्नेहलता यांनी लातूर येथील नातेवाईकाला फोन केला. फोनवर त्यांनी रडत आपण आत्महत्या करणार आहोत असे सांगू लागल्या. यानंतर तात्काळ लातूरमधील नातेवाईकांनी सोलापूरमधील नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी हॉटेल गाठले असता रुमचा दरवाजा बंद होता.

नातेवाईकांनी दरवाजा तोडून रुममध्ये पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. स्नेहलता यांनी साडीने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर नातेवाईंकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच प्रभू यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित गेले. त्यानंतर शवविच्छेदनानंतर प्रभू यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आलाय. दरम्यना, स्नेहलता यांनी आत्महत्या का केलीय याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.