मुंबई : मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारे साहित्यिक असूण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि मराठीमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मीती करणाऱ्या साधू यांच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा एक कटाक्ष...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूण साधू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते लेखक, नाटककार, पत्रकार, संशोधक, अभ्यासक, होते. मराठी साहित्यात त्यांनी विपूल लेखन केले. त्यांनी ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी स्वतंत्र लिखानालाही सुरूवात केली. त्यांच्या त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर, भारतातील एकुण राजकीय परिस्थितीवर काल्पनीक पण, वास्तव वाटतील अशा व्यक्तीरेखा त्यांनी आपल्या 'सिंहासन' आणि 'मुंबई' दिनांक या कादंबरीतून साखारल्या.


साधू यांच्या कादंबरीतील कथाबिज आणि ताकद ओळखून यावर 'सिंहासन' नावाचा मराठी चित्रपटही आला. हा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरला. इतकेच नव्हे तर, आजही मराठी चित्रपटसृष्टीतील राजकीय चित्रपटांचा इतिहास तपासताना साधूंचा 'सिंहासन' क्रमांक एकला राहतो. इतकेच नव्हे तर, राजकारणातही अनेक नेते जेव्हा राजकीय संदर्भ चित्रपटाच्या अनुशंघाने देतात तेव्हा सिंहासनचा उल्लेख होतो.


पुणे विद्यापिठात पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून सहा वर्षे काम पाहिलेल्या साधू यांनी साम्यवादी क्रांतीवरही विशेष लिखान केले आहे. साम्यवादी क्रांतीची मराठी वाचकाला खरी आणि सर्वप्रथम ओळख ही साधू यांनीच करून दिली. ‘एक माणूस उडतो त्याची गोष्ट’,‘कथा युगभानाची’,‘बिनपावसाचा दिवस’ हे त्यांचे कथासंग्रह वाचकाच्या विशेष पसंतीस उतरले. लोकप्रिय ठरले. ‘पडघम’सारखे नाटक ‘अक्षांश रेखांश’,‘तिसरी क्रांती’, ‘सभापर्व’यांसारखे ललित लिखानही त्यांनी केले.


साधू यांनी मराठी साहित्यात मानाचे समजले जाणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे (८०वे) अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’पुरस्कारही(२०१५ )  मिळाला होता.


अरुण साधू यांची साहित्यसंपदा



कादंबर्‍या


झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट


कथासंग्रह


एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा – संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती


नाटक : पडघम


ललित लेखन : अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)


समकालीन इतिहास : आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती
शैक्षणिक : संज्ञापना क्रांती