ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर ( Kantabai Satarkar ) यांचे निधन झाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर ( Kantabai Satarkar ) यांचे निधन झाले. कांताबाई यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Veteran Tamasha artist Kantabai Satarkar passes away)
कांताबाई सातारकर यांना तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला आहे.
कांताबाई सातारकर यांना तमाशाचा कुठलाही वारसा नव्हता. त्यांनी आपल्या मेहतीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे या क्षेत्रात निर्माण करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी तमाशात पुरुष भूमिका सहजतेने साकरलली. त्यांच्या पुरुष भूमिकेमुळे कांताबाईंनी महिला प्रेक्षकांना तमाशाकडे खेचून आणले. आपल्या उत्तम गायन, नृत्य आणि अभिनयातून त्यांनी तमाशाला पांढरपेशा समाजातही मानाचे स्थान मिळवून दिले होते.
दरम्यान, कांताबाई यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले आहे. त्यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे पुत्र रघुवीर, कन्या आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात श्रद्धांजली वाहताना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.