मालवण : मालवणच्या तळशील किना-यावर अवाढव्य व्हेल मासा मृत अवस्थेत वाहत आलाय. या महाकाय माशाचे वजन दहा टन तर लांबी ३० ते ३५ फूट असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या माशाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल दिसून येतंय. त्यामुळे हा महाकाय मासा पाहण्यासाठी समुद्रकिना-यावर नागरिकांनी गर्दी केलीय. हा मासा जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येईल.