अमरावती : या वर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले , शासनाने तूर खरेदी करावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने ही केली, अजूनही तूर उत्पादन शेतकऱ्यांची लाखो टन तूर खरेदी व्हायची  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच या शासकीय तूर खरेदी मध्ये  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींनी लाखो रुपयांची तूर नातेवाईकांच्या नावे विकल्याचा प्रकार समोर आला आहे.


शेतकऱ्यांनी शासनाक़डे दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बाजार समितीचे संचालक करीत आहेत. पण खऱ्या अर्थाने संचालकांनीही आवाज  उठवण्याची आणि शासनाकडे तक्रार करण्याची गरज आहे.