Sangli : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कीदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. आर आर आबा यांच्यानंतर रोहित पाटील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कवठेमहांकाळ नगरपरिषदमध्ये विजय मिळवल्यानंतर रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील याना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. रोहित आर आर पाटील यांच्या पॅनलचे सर्व 7 उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले


सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी  पार पडली. गावची एकूण मतदार संख्या ६७७ असून ३७८ मतदारांनी मतदान केले होते. 3 प्रभागांमधील 7 जागासाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 


या निवडणुकीत 55 टक्के मतदान झाले होते. शुक्रवारी सकाळी पासून तासगाव तहसीलदार कार्यलयात मतमोजणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित आर आर पाटील यांच्या पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनल मध्ये सरळ लढत होती. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.