वर्धा : MNS News :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता नव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे. पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. आता विदर्भातही मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे  विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे. (Vidarbha MNS state vice president Atul Wandile will join NCP)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आगे. उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ते घेणार प्रवेश  करणार आहेत.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या राष्ट्रवादीत अतुल वांदिले हे 40 पदाधिकाऱ्यासोबत प्रवेश  करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य ,सरपंच आणि पदाधिकारी अतुल वांदिले यांच्या सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे.


दरम्यान, पुणे दौऱ्यावर राज ठाकरे असतानाच मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मनसेची आक्रमक ओळख असलेले नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने मनसेपुढे आता आगामी निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे.