COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती : स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या नावाखाली अमरावतीत तरुणांनी अक्षरशः धिंगाणा घातला.... स्वातंत्र्यदिनाला या मुलांनी चक्क डीजेच्या तालावर वाट्टेल ती गाणी वाजवत हैदोस घातला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्राजवळ काही उत्साही कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 


सुरुवातीला इथे डीजे लावून देशभक्तीपर गीतं वाजवली जात होती. मात्र थोड्या वेळानं या ठिकाणी भलतीच गाणी वाजायला लागली.... आणि तरुणांनी वाट्टेल तसा धिंगाणा घातला.