Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सनेच्या विद्यार्थी सनेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी मुंबईमध्ये रील बाझ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे आमदार राजू पाटील, नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकरही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सेनेच्या कामाबद्दल बोलताना अमित ठाकरेंनी वडील राज ठाकरेंना आपली स्तृती न करण्याची विचित्र मागणी केली. ही मागणी ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. पण अमित यांनी नेमकी अशी मागणी का केली आणि त्यावरुन टाळ्यांचा कडकडाट का झाला पाहूयात.


साहेबांना वाटत असेल आपली नियुक्ती चुकली नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा," असं म्हणत अमित ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर अमित ठाकरेंनी, "मला विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही गेल्या एक दिड वर्षात जी मेहनत घेतली आहे. जे फिरलाय. जे लाखो विद्यार्थ्यांना भेटला आहात. त्यांचे विषय मार्गी लावलेत ते पाहून तुम्हाला खरच हॅट्स ऑफ. हे सोपं नाही," अशा शब्दांमध्ये आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. "मी चुकत नसेल तर मला पुसटसं आठवतंय त्यानुसार गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी रोजी साहेबांनी अचानक मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून नेमलं. तुमच्या सहकार्याने तसेच तुम्ही जो मदतीचा हात दिला आहे त्यामुळे आपण जी विद्यार्थी सेना बांधली आहे. त्यामुळे साहेबांना कुठेतरी वाटत असेल की आपण ही नियुक्ती करुन चुकलो नाही असं मला वाटतं. कारण हे ते मला बोलले नाहीत," असं अमित ठाकरे म्हणाले असता उपस्थित हसू लागले.


माझी विनंती आहे की माझी स्तृती करु नका


पुढे बोलताना अमित ठाकरेंनी राज ठाकरेंच्या स्वभावाबद्दल सांगितलं. "साहेबांचा एक स्वभाव आहे की, चुकल्यावर ते लगेच जवळ घेऊन बोलतात. कुठे चुकलाय ते समजवतात. बरोबर असल्यावर ते कधी स्तृती करत नाहीत. मला वाटतं त्या स्वभावामुळे मी आज जिकडे आहे त्या ठिकाणी पोहचू शकलो. कारण ते माझं मोटीव्हेशन आहे. त्या व्हॅलिडेशनसाठी मी काम करतो, मेहनत करतो. साहेब आत ऐकत आहेत. माझी विनंती आहे त्यांना की बाबा जरा काही वर्ष माझी स्तृती करु नका," असं अमित म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.


नक्की पाहा >> Video: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, "मला 100 टक्के खात्री..."


साहेबांना पहिली भेट


"मला वाटतं पुढच्या एक ते दीड महिन्यात मला वाटतं आपण विद्यार्थी सेनेकडून पहिली भेट साहेबांना देणार आहोत. कारण पुढे सिनेट निवडणुका लागत आहेत. यामध्ये पक्षाचा हातभार, मदतीचा हात आणि साहेबांचा आशिर्वाद असेल तर मला वाटतं आपण 10 च्या 10 सिनेट मेंबर आपण साहेबांना निवडूण देऊ शकतो. आज आपण एन्जॉय करतोय पण उद्यापासून कामाला लागाल अशी अपेक्षा करतो," असंही अमित ठाकरे म्हणाले.



अमित ठाकरेंनी रील बाझ या कार्यक्रमाच्या आयोजनामागील कारणांबद्दल बोलताना रील बनवणाऱ्यांच्या कष्टाचं कौतुक करण्याच्या हेतूमधून हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं.