COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : पुण्याची मेट्रो स्टेशन कशी असतील, याचा EXCLUSIVE लूक आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत... पुण्याचे मेट्रो स्टेशन हे पुण्याची ओळख असलेल्या 'पगडी'च्या आकाराचं असणार आहे... पुण्याची संभाजीनगर आणि डेक्कन ही दोन स्टेशन्स पगडीच्या आकाराची असतील. 'झी २४ तास'ला या स्टेशन्सचा EXCLUSIVE फोटो मिळालाय.


पुण्याच्या मेट्रो स्टेशन्सचा लूक पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा असेल.... बालगंधर्व मेट्रो स्टेशनचं आर्किटेक्चर हे सांगितिक पार्श्वभूमीचं असेल, अशी माहिती 'महामेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिलीय. 


पुण्याच्या मेट्रोचं काम जोरात सुरू आहे... पुण्याच्या मेट्रो स्टेशन्सचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मेट्रो स्टेशन  पुण्याची ओळख जपणारं असणार आहे... पुण्याचं ऐतिहासिक, सांस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करणारी मेट्रो स्टेशन्सची वास्तूरचना असणार आहे. संभाजी पार्क आणि डेक्कन ही मेट्रो स्टेशन्स पुण्याची ओळख असलेली 'पगडी'च्या आकाराची असणार आहेत. मात्र, ही पगडी पुणेरी पगडी नव्हे तर मावळ्यांच्या पगडीच्या आकाराची असणार आहेत.


बालगंधर्व मेट्रो स्टेशनची स्थापत्यरचना ही सांगितिक प्रतीकांवर आधारित असणार आहे... तर उद्योग परिसरातली मेट्रो स्टेशन्स उद्योगाच्या थीमवर आधारीत असणार आहेत... पुण्यातले वाडे आणि पेठांवर आधारित स्थापत्य रचनाही पुणे मेट्रो स्टेशन्समध्ये असणार आहे.


उंचावरुन या मेट्रो स्टेशन्सची ऐतिहासिक रचना उठून दिसणार आहे... किल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर या मेट्रो स्टेशन्समध्ये करण्यात येणार आहे... या सगळ्या मेट्रो स्टेशन्सना स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत... पुण्यातल्या पेठा,  जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड या ठिकाणहून स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत. 


पुण्यात मेट्रो आल्यावर पुणं सुपरफास्ट झालं तरी या मेट्रो स्टेशन्सच्या रचनेच्या निमित्तानं पुण्याची ओळख मात्र जपली जाणार आहे.