बीड : आतापर्यंत तब्बल २१ वेळा प्रसुती झालेल्या माजलगावमधील लंकाबाईंवर आभाळ कोसळलंय. तिच्या नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या दुर्दैवी महिलेचं नाव लंकाबाई खरात... आत्तापर्यंत २१ वेळा तिची प्रसुती झालीय. तीन महिन्यांपूर्वी लंकाबाई ऊस तोडणीच्या कामासाठी कर्नाटकला गेल्या होत्या. तेव्हा ऊसाच्या फडात त्यांनी २१ व्या मुलीला जन्म दिला. पण, दुर्दैवानं त्या नवजात मुलीचा मृत्यू झालाय. त्यामुळं या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प परिसरात मालोजी देवीदास खरात हे गेल्या १२-१५ वर्षांपासून पाल ठोकून राहतात. लंकाबाई ही त्यांची पत्नी... 


धक्कादायक म्हणजे, वयाच्या केवळ चाळीशीत आतापर्यंत लंकाबाईंची २१ वेळा प्रसुती झाली आहे. मात्र, त्यापैंकी नऊ अपत्ये दगावली आहेत तर लंकाबाईंच्या ९ मुली आणि २ मुलं जिवंत आहेत. हलाखीचं जीणं जगणाऱ्या लंकाबाईंवर आता पुन्हा मुलं गमावण्याची वेळ येऊ नये.