मुंबई : खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यात आजवर अनेक प्रजातींचे मासे सापडले आहेत. मुख्य म्हणजे या माशांबाबत अनेकांना माहितीसुद्धा आहे. पण, काही दिवसांपूर्वी पालघर येथे समुद्रकिनारी कोळ्यांच्या जाळ्याता अशा प्रकारचे मासे आढळले जे पाहता अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरच्या समुद्रात चक्क हवेत उडणारा मासा सापडला आहे. या माशाच्या मागं कोणताही मोठा शिकारी मासा लागल्यास तो शेवटचा पर्याय म्हणून चक्क हवेत उडी मारतो. 


जवळपास 50 फुटांपर्यंत हा मासा हवेत उडी मारतो. कोणत्याही मोठ्या माशाचं भक्ष्य बनण्यापूर्वी तेथून पळ काढण्यासाठी हा मासा पाण्याच्या वर येतो आणि त्याच्या पंखांची अशी रचना असते की, तो हवेत उडू लागतो आणि पुन्हा पाण्यात जातो. कोळी समुदाय या माशाला पाखरु मासा म्हणून संबोधतात. पश्चिम किनारपट्टीवर हा मासा कमी आढळतो. त्यामुळं पालघरच्या समुद्र किनाऱपट्टी भागात हा मासा आला तरी कसा याबाबतचा अभ्यास आता सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय ठरणार आहे.